कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणारी टोळी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई;आरोपींकडून एक लाख ११ हजाराचा मुद्देमाल हस्तगत;महिनाभरात चार टोळ्या जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ जुलै):-कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
यातील तीन आरोपी हे अल्पवयीन असून, चौथा आरोपी सोहेल महेमुद खान (वय २१ वर्षे, रा.पंपींग स्टेशन,आलमगीर,भिंगार, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी मोटरसायकल असा एक लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.रोहिदास दादाराव रूमाले (वय २१ वर्षे रा. रहाटी,ता.दिग्रस, जि.यवतमाळ) व त्यांचा मामेभाऊ प्रविण गव्हाणे हे दोघे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणीसाठी दौंड येथे जात असताना यवतमाळ येथून दि.१ जुलै रोजी पहाटे पाच वाजता माळीवाडा बसस्थानकावर बसणे आले होते.माळीवाडा बसस्थानक येथून पायी रेल्वेस्टेशनकडे जात असताना मल्हार चौकातील आयकॉन पब्लिक शाळेसमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडविले. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून रोहिदास दादाराव रूमाले यांचा वनप्लस कंपनीचा मोबाईल व हजार रुपये काढून घेतले व प्रविण गव्हाणे यांना चाकुचा धाक दाखवून दोनशे रुपये काढून घेतले होते.रोहिदास रूमाले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला आदेश दिले होते. कोतवाली पोलिसांनी तपास करून या गुन्हातील चार जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम,एव्हिएटर मोपेड मोटार सायकल (एमएच १६ बीडब्लु ७७४३) व पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच १६ एबी ३५९४) या दोन गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल असा एक लाख ११ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन,सुखदेव दुर्गे,पोलिस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख,तेहसिन शेख,अभय कदम,संदीप थोरात, अमोल गाडे,याकूब सय्यद,सुजय हिवाळे,कैलाश शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ,अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.