अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ जुलै):-पारनेर व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करुन एकुण १५,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

कारवाई.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/संतोष खैरे, विजय ठोंबरे,पोकॉ/रणजीत जाधव व अमृत आढाव अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने पारनेर व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणा-या ठिकाणी छापा टाकुन एकुण १५,१०,०००/- (पंधरा लाख,दहा हजार रुपये किंमतीचा एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर,एक टाटा कंपनीचा ढंपर व शासकीय वाळू असा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पारनेर व एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपत भोसले उविपोअ नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
