अपनी सुरक्षा अपने हाथ संपूर्ण सुरक्षा केंद्र के साथ आरोग्य तपासणी शिबिरात एकूण १५९ ते २०० रुग्णांची मोफत तपासणी;अति जोखीम वर्तन करत असलेल्या रुग्णांना संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अहमदनगर (दि.४ ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र अहमदनगर,एकात्मिक सल्ला व समुपदेशन तपासणी केंद्र, तसेच अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचालित अमृतदिप स्थलांतरित प्रकल्प,विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुपा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात एकूण १५९ ते २०० रुग्णांची मोफत तपासणी व मोफत उपचार देण्यात आले.यावेळी डॉ.विनय अग्रवाल,डॉ.धनेश मुंडणकर,डॉ.सुरेश घोलप,सविता बेल्हेकर,विकास वाळुंज समुपदेशक,दिनेश लोंढे,रूपाली देशमुख प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विलास भुजबळ,अंजली सावडेकर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम,सागर विटकर प्रकल्प व्यवस्थापक अमृतदिप प्रकल्प,प्रसाद माळी,मच्छिंद्र दूधवडे क्षेत्रीय अधिकारी, सागर फुलारी प्रकल्प व्यवस्थापक संपूर्ण सुरक्षा केंद्र, वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख क्षेत्रीय अधिकारी आदी जण उपस्थित होते.शिबिरा वेळी व्यक्तींशी बोलताना सविता बेल्हेकर,विकास वाळुंज समुपदेशक यांनी एच. आय.व्ही बाबत लोकांना वैयक्तिक माहिती सांगितली. तपासणी का करावी एच.आय.व्ही.ची स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे याविषयी प्रत्येक व्यक्तीला माहिती दिली.डॉ. सुरेश घोलप डॉ.विनय अग्रवाल डॉ.धनेश मुंडनकर यांनी आरोग्य,आहार,व्यायाम यावर मार्गदर्शन करून व्यक्तीने निरोगी राहायचे असेल तर आहार,व्यायाम नित्य नियमाने करणे गरजेचे आहे यावर लोकांना माहिती सांगितली.सागर विटकर अमृतदिप स्थलांतरित प्रकल्प,प्रकल्प व्यवस्थापक, प्रसाद माळी मच्छिंद्र दूधवडे,यांनी स्थलांतरित कामगारांवर कार्य करत असलेला स्थलांतर प्रकल्प यावर माहिती सांगून स्थलांतर करत असलेल्या प्रत्येक कामगाराने आपली रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे.दर तीन महिन्याला रक्ताची तपासणी करून घेणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यावर मार्गदर्शन केले.सागर फुलारी प्रकल्प व्यवस्थापक, वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख यांनी संपूर्ण सुरक्षा केंद्र मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधा याबद्दल माहिती देत एच.आय.व्ही मुक्त राहणे करता समुपदेशन व मार्गदर्शन आरोग्यविषयक विषय योजनांची माहिती व गरजेनुसार विविध सेवा केंद्र संदर्भ सेवा दिल्या जातात तसेच त्वचारोग, गुप्तरोग इत्यादी तपासणी करणे गरजेचे आहे संपूर्ण सुरक्षा केंद्र हे अति जोखीम वर्तन करत असलेल्या परंतु त्यांना एचआयव्ही व गुप्तरोगाचा धोका असू शकतो अशा रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे यावर माहिती सांगितली.विलास भुजबळ,अंजली सावडेकर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम क्षयरोग कसा पसरतो. क्षयरोग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जास्त खोकला आल्यास किंवा वारंवार खोकला येत असेल तर क्षय रोगाची तपासणी करणे गरजेचे आहे यावर माहिती सांगितली.एच.आय.व्ही बाबत दर्शनीय भागात पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.तसेच रक्त तपासणी बाबत कोणकोणत्या तपासणी केल्या जातील याबाबत दिनेश लोंढे, रूपाली देशमुख,यांनी माहिती सांगून रक्त तपासणी का करावी यावर मार्गदर्शन केले.प्रसाद माळी,मच्छिंद्र दुधवडे,वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख शिबिर यशस्वीते साठी परिश्रम घेतले.