राज्य स्तरीय रोलर रिले स्केटींग व स्पीड स्केटींग स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे यश
अहमदनगर (४ ऑगस्ट):-दि.३१ जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर मधील विभागीय किडा संकुल येथे राज्य स्तर स्पीड व स्केटींगरीले स्पर्धेचे आयोजन राज्य रिले स्केटींग संघटना व रिले स्केटींग फेडरेशन ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धामध्ये राज्यातील सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.यात अहमदनगर जिल्हातील खेळाडूंनी अत्यंत चुरशीची लढत देत यश संपादन केले.तसेच ६० गुण प्राप्त करून सर्वसाधारण व विजेत्याचे चषक प्राप्त केले.अहमदनगर संघामध्ये श्रीरामपूर,संगमनेर येथील नगर शहर येथील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
निकाल
१- राजविर प्रफुल्ल काटे ६ वर्ष बालनिकेत व्ही आर डी ई , टेनासीटी १ सुवर्ण, १ रौप्य.
२. वैभव प्रदिप पाटोळे – १० वर्षे – १ कांस्य – श्री. आनंद पार्श्व गुरुकुल
३. कार्तीक चेतन आडकर १० वर्ष- १ कांस्य- तक्षिला स्कूल
४. पंपिता बिस्वास १६ वर्षे – १ सुवर्ण, १ रजत तक्षिला स्कूल
५. आदर्श बिस्वास- १२ वर्षे १ सुवर्ण, १ रजत तक्षिला स्कूल
६. स्नेहा दळवी – १६ वर्षे – १२ रजत, १ कांस्य- तक्षिला स्कूल
८. वेदांत साबळे १६ वर्षे १२ जन, १ कांस्य तक्षिला स्कूल
९. सत्यम चौभे- १६ वर्ष १ रजत, १ कास्य तक्षिला स्कूल
वरील सर्व खेळाडूंचे तक्षिला स्कूलच्या प्राचार्या सौ.जयश्री मेहत्रे,आनंद पार्श्व गुरुकूलच्या प्राचार्या सौ.कादंबरी सुर्यवंशी,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री.सुंदरराव पाटोळे, उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत बंगारी यांनी अभिनंदन कले,तसेच क्रिडा शिक्षक श्री.प्रदिप पाटोळे,जावेद शेख,अश्वीनी नन्नवरे व सचिन अळकुटे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.