साईदिप हॉस्पिटल नर्स,डॉक्टर व कर्मचाऱ्यांकरिता एचआयव्ही एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नगर प्रतिनिधी (दि.१० ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर , स्नेहालय संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या मार्फत तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स,डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी एच.आय.व्ही/एडस् संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली.जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम संरचना, एच.आय.व्ही/एड्स मूलभूत माहिती,एच.आय.व्ही.ची उत्पत्ती,संक्षिप्त इतिहास, एच.आय.व्ही झाल्यानंतर त्याचा सामाजिक व आर्थिक परिणाम काय होतो.एच.आय.व्ही संसर्गित कर्मचारी असल्यास,भेदभाव न करता त्यांना सहानुभूतीची वागणूक देणे,उपचारात सातत्य राहण्यासाठी मदत करणे या बाबत असलेले गैरसमज दूर करणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.एच.आय.व्ही. विषाणूची वैशिष्ट्ये, एच.आय.व्ही संसर्गाचे मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहे,एड्स काय आहे, एच.आय.व्ही प्रामुख्याने कोणत्या चार कारणांमुळे होतो.एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने,एच.आय.व्ही संसर्गित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला, एच.आय.व्ही संसर्गित रक्त वापरल्याने,एच.आय.व्ही संसर्ग सुई अथवा सिरींजचा वापर केल्याने,या चार कारणाने एचआयव्ही पसरतो.त्याच प्रमाणे एच.आय.व्ही संसर्ग पांढऱ्या पेशीवर कशाप्रकारे अतिक्रमण करून प्रतिकार शक्ती कमी करते यावर माहिती सांगितली.तसेच एच.आय.व्ही कोणत्या कारणाने पसरत नाही एचआयव्ही संसर्गित व्यक्ती सोबत मैत्री केल्याने हात मिळवल्याने,मिठी मारल्याने, एकत्र जेवण केल्याने , संसर्गित व्यक्तीने वापरलेली भांडी कपडे त्याच प्रमाणे संसर्गित व्यक्तीची निगा व देखभाल ठेवल्याने डास चावल्याने एच.आय.व्ही. चा संसर्ग होत नाही.यावर माहिती सांगितली.एच.आय व्ही संसर्गाचे लक्षणे कोणती आहेत यावर मार्गदर्शन केले. गुप्तरोग असेल तर निरोधचा वापर करणे गुप्तरोगावर औषधोपचार उपलब्ध आहेत झाल्यास त्वरित संबंधित डॉक्टरांना दाखवून घेणे. एच.आय.व्ही.उपलब्ध सुविधा केंद्र व उपलब्ध मोफत सेवा, ART औषधोपचार,पीपीटी सिटी कार्यक्रम,NACO, हेल्पलाइन 1097 इत्यादी बाबत माहिती देऊन उपस्थित प्रश्नांना चर्चात्मक पद्धतीने माहिती दिली.पी.पी.टी व्दारे सादरीकरण करण्यात आले.सविता बेल्हेकर, शर्मिला कदम समुपदेशक, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र यांनी केंद्र मार्फत कशाप्रकारे काम चालते तपासणी पूर्व समुपदेशन म्हणजे काय संमती नंतर ऐच्छिक तपासणी करणे.तपासणी व समुपदेशन करून तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवण्यात येतो,पती-पत्नी यापैकी कोणी जर एक पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना मानसिक आधार देऊन दोघांचे समुपदेशन करणे,पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला ART औषध उपचार सुरू करण्यात येतात.तसेच गरोदर महिलांमध्ये पॉझिटिव्ह असेल तर त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते गरोदर मातेकडून तिच्या बाळाला एच.आय.व्ही.चा संसर्ग होण्यापासून कशाप्रकारे वाचू शकतो.एच.आय.व्ही थांबवायचा असेल तर निरोध चा वापर केला पाहिजे निरोध चे विविध फायदे आहेत नको असलेली गर्भधारणा थांबवणे, गुप्त रोगापासून मुक्ती मिळवणे,आणि एच.आय व्हीं. पासून संरक्षण करणे,यावर मार्गदर्शन केले.पीपीटी द्वारे सदरीकरण करण्यात आले.संपूर्ण सुरक्षा केंद्राचे व्यवस्थापक श्री.सागर फुलारी यांनी केंद्राचे ध्येय,उद्दिष्ट, अतिजोखीम वर्तन करत असलेल्या परंतु एचआयव्ही निगेटिव्ह व्यक्तींना समुपदेशन योग्य मार्गदर्शन केंद्र मार्फत दिले जाते,तसेच त्यांची दर तीन महिन्याला रक्ताची पुन्हा चाचणी केली जाते.आरोग्य विषयक व सामाजिक संरक्षण विषय योजनांची माहिती देऊन गरजेनुसार विविध सेवा केंद्रात संदर्भ सेवा दिल्या जातात.विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती केंद्रा मार्फत केली जाते.पीपीटी द्वारे सादरीकरण करून माहिती सांगितली.आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी,अरबाज शेख यांनी केले.या कार्यशाळेस एकूण ४५ कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.कार्यशाळा आयोजनासाठी संपूर्ण सुरक्षा केंद्रांचे श्री. अरबाज शेख,वैशाली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.तर ऋषिकेश कालगावकर साईदीप हॉस्पिटल,तेजल गरजे साईदीप हॉस्पिटल माया वाघमारे सिस्टर यांनी कार्यशाळा घेण्यासाठी विशेष सहकार्य केले.