अहमदनगर जिल्हापरिषदचे वैद्यकीय अधिकारी निलंबित तर रुग्णवाहिकेचा चालक व डॉक्टर यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई
अहमदनगर (दि.१० ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला.या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.साहिल खोत यांच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बुधवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सेवा निलंबनाची कारवाई केली.यासह एक डॉक्टर व रूग्णवाहीकेचा चालक अशा दोघांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की कामात कुचराई करणाऱ्या अधीकारी वा कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे म्हणाले.