भरतनाट्यम् डान्स स्टुडिओच्या वतीने १२ ऑगस्ट पासून ‘मंगळागौर’ शिबीराला सुरुवात
अहमदनगर (दि.१० ऑगस्ट):-पाईपलाईन रोड परिसरातील श्रीराम चौक येथील भरतनाट्यम् डान्स स्टुडिओच्या वतीने शनिवारी दि.12 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत दर शनिवारी व रविवारी ‘मंगळागौर’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे शनिवारी दि.12 रोजी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्यात सण-उत्सवात महिलांचा मोठा सहभाग असतो.यात मंगला गौरीला विशेष महत्व आहे. मंगळा गौरीचे पारंपारिक गीते म्हणून महिला एकमेकींना चिडवतात,हास्यनृत्य सादर करण्यात यात मोठी हौस असते.नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ यातील लोकप्रिय गीत तसेच ‘घागर घुमू दे, किसबाई किस…पोरी पिंगाग पोरी पिंगा…अशा प्रकारे गीतांतून मुलींना महिलांना या शिबीरातून मंगळागौर नृत्य शिकविले जाणार आहेत.तरी जास्तीत जास्त महिला-मुलींनी यात सहभागी होण्यासाठी (मो.9689352011) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन मानसी देठे यांनी केले आहे.