स्व.द्रोपदाबाई गोडगे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम चिंचोली गुरव येथे संपन्न..!!
संगमनेर(राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते बबन कारभारी गोडगे यांच्या मातोश्री व अतुल गोडगे व विजय गोडगे यांच्या आजी सुसंस्कृत व्यक्तिमत्व स्वर्गीय गभा.द्रोपदाबाई कारभारी गोडगे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी १० वाजता येथिल मारुती मंदिर चिंचोली गुरव येथिल सभागृहात संपन्न झाला.स्वर्गीय द्रोपदाबाई गोडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर प्रबोधनकार भागवताचार्य रूपाली दीदी सवणे परतूकर जिल्हा जालना यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी तुकाराम सोनवणे,निवृत्ती गोडगे,अनिल गोडगे व अनेक मान्यवरांनी स्वर्गीय द्रोपदाबाई गोडगे यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.स्वर्गीय द्रोपदाबाई गोडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त चिंचोली गुरव ग्रामस्थ,गोडगे परिवारावर प्रेम करणारी सर्वच नातेवाईक मंडळी,महिला भगिनी मोठ्या संख्येने प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.