अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी केला जप्त दोघांवर गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.७ ऑगस्ट) रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील भोरमळा (शेळकेवाडी) येथे करण्यात आली.बाजीराव हरिभाऊ खंडागळे (वय २७) व विनायक उत्तम भोर (वय ३८, रा.भोरमळा,शेळकेवाडी,ता. संगमनेर) अशी या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत.या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोटा येथील कच नदीतून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस/कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांना मिळाली होती. पोलिस कच नदीकडे जात असताना त्यांना लाल रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.१७. सी.एक्स.०८७४) वाळू भरून येत असल्याचे निदर्शनास आले.त्यांच्याकडे रॉयल्टी पावती नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी ३ हजार रुपयांची एक ब्रास वाळू व ट्रॅक्टरसह ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.