कासोदा गावच्या सफाई कर्मचाऱ्यांना ना पगार ना शासनाच्या सुविधा;भारतीय मेहतर समाज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी (दि.१० ऑगस्ट):-जळगाव जिल्ह्यातील कासोदा गाव येथील सफाई कामगार व आठवडे बाजार दलित वस्ती येथील समस्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहमदनगर येथील अखिल भारतीय मेहतर समाज संघटने मार्फत ई.मेल.द्वारे निवेदन देण्यात आले आहे.अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने अर्जात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात कासोदा ग्रामपंचायत मध्ये दलित वर्गातील सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कासोदा गावात पूर्ण ईमानदारी मेहनतीने व नियमितपणे गावातील स्वच्छता करून देखील या कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायत जाणून बुजून दोन वर्षांचे पगार थकवले आहे.तसेच या सफाई कामगारांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात आहे आज या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.एक महिला सफाई कर्मचारीला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगीतल्या ठिकाणी काम करत असताना तिला हाताला लागले हातातून रक्त आले तरी चांगल्या डॉक्टरांकडे माणुसकी म्हणुन देखील पाठवले नाही. अप्रशिक्षित डॉक्टरकडे पाठवले त्यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे उपचार केले या महीलेच्या हाताला टाके पडले असून परंतु ग्रामपंचायत कडून या महिलेला उपचारासाठी खर्च सुद्धा देण्यात आले नाही.आठवडे बाजार हि दलित असून या वस्तीवर रोड,ड्रेनेज लाईन,पिण्याचे पाणी,पथदिवे यापैकी कुठलेही प्रकारची सोयी सुविधा या दलित वस्तीवर ग्रामपंचायत कडून दिली जात नाही.शासनाकडून दलित वस्तीच्या सुधारणा साठी निधी येतोय तो निधी कोणाचे घशात घातला जातो हा सर्वात मोठा प्रश्न येथील नागरिकांच्या निर्माण झाला आहे.सफाई कर्मचारी हा साऱ्या गावाची घाण उचलतो पण त्याने घाणीत राहिला पाहिजे का? ग्रामपंचायतील ग्रामविकास अधिकारी व सरपंच जाणून बुजून या दलित वस्ती मध्ये कुठल्याही प्रकारची सोय सुविधा देत नाही.या सर्व गोष्टीची चौकशी होऊन ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी.व गावातील जातीयवादी मुजोर सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा सचिव विक्रम चौहान ( सर ),संतोष सारसर कुणाल बैद,सल्लागार प्रशांत पाटोळे,सिद्धार्थ सोलंकी, सामाजिक कार्यकर्ते बंटी लोट,अभिषेक भगवाने,धीरज बैद,संजय खरे, पवन सेवक,दिलीप सूर्यवंशी यांनी केली आहे.