Maharashtra247

संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

 

संगमनेर (राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास घडली.बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक-अहमदनगर या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.आयेशा मुनीर बेग (वय ५५,रा.संगमनेर खुर्द,ता.संगमनेर) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.सिन्नर आगाराची संगमनेर,लोणी,राहुरी असा मार्ग असणाऱ्या नाशिक-अहमदनगर बस (एम. एच. २०, बी.एल.४०५६) संगमनेर बसस्थानकात आली होती.आयेशा बेग या त्यांच्या नातेवाईकांसह संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास ही बस बसस्थानकातून बाहेर पडत असताना तिच्या चाकाखाली आयेशा बेग चिरडल्या गेल्या.त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र त्यांचा त्यातच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

You cannot copy content of this page