Maharashtra247

अल्पवयीन मुलीचा ३ वर्षानंतर शोध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) पथकाची कामगिरी 

 

अहमदनगर (दि.१० ऑगस्ट):-पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने दि.०९/०१/२०२० फूस लावून पळवून नेले होते.या घटनेला तब्बल तीन वर्ष झाले.या बाबत सुपा पोस्टे गुरनं।०२/२०२० भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांचे कडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास पोसई/शिंदे हे करीत होते.नमुद गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) येथे चालू असताना मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष शाखेचे अधिकारी व अंमलदार वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन शोध घेत असताना सदर अपहरीत मुलगी ही नगर शहर येथील एका विद्यालयात शिक्षण घेत असले बाबत त्यांना माहिती मिळाली.अधिक तपास करता सदर मुलीचे मामा यांचा शोध घेवून त्यांचे सह पोनि/हरिष खेडकर,पोहेकॉ/समीर सय्यद, मपोहेकॉ/अनिता पवार,चापोकॉ/काळे हे संबंधीत विद्यालय येथे जावून त्या मुलीची ओळख पटवून त्या मुलीला सोबत घेवून सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.व हा गुन्हा पुढील तपासकामी मुळ कागदपत्रासह सुपा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.ही कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. कमलाकर जाधव पोलीस उपअधिक्षक अहमदनगर,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहमदनगर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page