Maharashtra247

शहरात कोतवाली पोलिसांची कारवाई घातक शस्त्रे जप्त  तलवार व गुप्तीचा समावेश दोघांवर गुन्हे दाखल

अहमदनगर (दि.४ नोव्हेंबर):-घरामध्ये तलवारी, गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

नगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली. तुषार अर्जुन हरेल (वय २७ वर्षे) अर्जुन विष्णू हरेल (वय ६३ वर्षे) (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड अहमदनगर) असे आरोपींची नावे आहेत.अधिक माहिती अशी की २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये आरोपी तुषार व अर्जुन या दोघांनी त्यांच्या घरात अवैधरित्या तलवारी व गुप्ती ठेवल्या आहेत. माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तेथे जात छापा टाकला. त्यांच्या घरामध्ये बेडखाली दोन तलवारी व एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकाँ तनविर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, ए पी इनामदार, पोकाँ अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page