स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दरोड्याच्या तयारीत असलेली ११ जणांची टोळी पकडली;तब्बल ८ लाख ५३ हजारांचा मुद्देमालासह जप्त
अहमदनगर (दि.४ नोव्हेंबर):-दरोड्याच्या तयारीतील 11 सराईत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.ताब्यात घेतलेले आरोपी हे दरोडा व ATM चोर आहेत.
त्यांच्या कडून 8,53,810/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळी पथके नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.नमुद सुचना प्रमाणे पथके आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, राहुरी ते अहमदनगर जाणारे रोडवरील शनिशिंगणापुर फाटा या ठिकाणी 10 ते 15 इसम कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या.पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी शनिशिंगणापुर कडे जाणारे रोडलगत जावुन खात्री करता तेथे टपरीचे आडोशाला अंधारात काही इसम बसलेले दिसले व टपरीजवळ 2 कार, 2 मोटारसायकल,पैकी एका मोटारसायकल जवळ तिन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता एका इसमाने मोटार सायकल चालु करुन त्यावर 3 इसम बसुन भरधाव वेगात निघुन गेले.अंधारामध्ये बसलेले उर्वरीत इसम पळण्याचे तयारीत असताना त्यांना योग्य त्या बळाचा वापर करुन ताब्यात घेवुन त्यांना सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर, 2) संतोष सुखराम मौर्या वय रा.गजल हॉटेलसमोर नेवासा, रोड श्रीरामपुर, मुळ रा. लोथा, पो. लंम्भुऑ, जिल्हा फत्तेपुर, उत्तरप्रदेश, 3) सागर विश्वनाथ पालवे रा.गजानन कॉलनी,अहमदनगर, मुळ रा. मेहेकरी, ता. नगर, 4) बबलु उर्फ दानिश शौकत शेख रा.वार्ड नं. 01, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, 5) आदिनाथ सुरेश इलग रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, 6) रितेश सुरेश दवडे रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापुर, 7) दिपक महादेव साळवे रा. मोरे चिंचोरे, ता. नेवासा, 8) रमेश भाऊसाहेब वाकडे रा. भोकर, ता. श्रीरामपुर, 9) प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी, रा. बालका हायस्कुल जवळ, वार्ड नं. 03 श्रीरामपुर, 10) मिलींद मोहन सोनवणे रा. हरेगांव, ता. श्रीरामपुर, 11) अविनाश कारभारी विधाते रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, संगमनेर, ता. संगमनेर, असे असल्याचे सांगितले. ताब्यातील संशयीतांना पळुन गेलेल्या इसमांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे 12) दादा खंडु गांगुर्डे रा. कात्रड, ता. राहुरी (फरार) 13) शिवाजी मिठु शिंदे रा. कात्रड, ता. राहुरी (फरार) 14) संतोष शेषराव निकम रा.कात्रड, ता. राहुरी (फरार) असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व कब्जात एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार,2 सुरे,चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, स्विफ्टकार,अल्टोकार, युनिकॉन मोटार सायकल, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, रोख रक्कम, 9 विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण 8,53,810/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1243/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयीताकडे वरील मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने खालील प्रमाणे जबरी चोरी, एटीएम चोरीचा प्रयत्न व मंदीर चोरीचे एकुण – 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व डॉ.श्री. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,सोपान गोरे,मनोहर शेजवळ,सफौ/बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,मनोहर गोसावी, अतुल लोटके देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,सचिन अडबल, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, अर्जुन बडे, चापोकॉ/अरुण मोरे यांनी केलेली आहे.