Maharashtra247

तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे मा.लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

संगमनेर (दत्तात्रय घोलप):-अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संपूर्ण तालुकाभर विकासपुरुष म्हणुन ओळख असलेले तळेगाव दिघे गावचे युवा नेतृत्व माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम संगमनेर तालुक्यातील जांभूळवाडी फाटा निळवंडे डावा कालवा याठिकाणी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक भारतशेठ मुंगसे,माजी उपसभापती अविनाश सोनवणे,अहमदनगर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे,ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हौशीराम सोनवणे,कौठे कमळेश्वर गावचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे,देवकौठे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे,संपत आरोटे,संदीप कार्ले, मच्छिंद्र काळे,आत्माराम जगताप,अक्षय दिघे,विजय दिघे,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, भास्कर खेमनर,विशाल काळे,सचिन गुंजाळ यांसह लाभधारक क्षेत्रातील शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page