
संगमनेर ( दत्तात्रय घोलप ):-निळवंडे धरणही झाले,पाट कालवे देखिल झाले…दुष्काळी भागत पाणीही आले..माञ वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना वितरिकेद्वारे पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसे प्रयत्न सुरु आहेत.याचा देखील पाठपुरावा आम्ही सातत्याने करतो आहेत.पिढ्यान पिढ्या येथिल शेतकऱ्यांनी पाहिलेल्या निळवंडे पाण्याची स्वप्न आज अखेर पूर्णत्वास गेले आहे.
तळेगाव पट्ट्यातील दुष्काळी भागातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडे डाव्या कालवाद्वारे पाणी मिळते आहे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी फाटा येथे निळवंडे कालवातून सोडण्यात आलेल्या पाणीपूजन कार्यक्रमप्रसंगी केले.यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदतोत्सव साजरा केला.याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक भारतशेठ मुंगसे,माजी उपसभापती अविनाश सोनवणे,अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबसाहेब कांदळकर,अहमदनगर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे,ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हौशीराम सोनवणे,कौठे कमळेश्वर गावचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे,देवकौठे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे,संपत आरोटे,संदीप कार्ले, मच्छिंद्र काळे,आत्माराम जगताप,अक्षय दिघे,विजय दिघे,माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, भास्कर खेमनर,विशाल काळे,सचिन गुंजाळ यांसह लाभधारक क्षेत्रातील शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषाबाजीही केली.