फटाक्यांमुळे सावेडी येथील घराला आग;अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात
अहमदनगर (दि.१२ नोव्हेंबर):-ऐन दिवाळीच्या दिवशी सावेडी परिसरातील नागरिक लक्ष्मीपूजन करत असताना येथील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग लागली असून या आगीत कोणतेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसून अग्निशमन दलाने तातडीने येऊन ही आग विझवली आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते बसपाचे संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत लवकर येऊन ही आग त्वरित विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला.