शेकडो समर्थकांसह युवानेते प्रशांत शिंदे यांचा भाजपात प्रवेश;आमदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत चोंडीत पार पडला भव्य पक्षप्रवेश सोहळा
कर्जत-जामखेड (प्रतिनिधी):-ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा रविवारी आमदार प्रा राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला. प्रशांत शिंदे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. जवळा ग्रामपंचायतवर आता भाजपचा कब्जा झाला आहे.
युवानेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल प्रशांत शिंदे, सोनाली राहूल पाटील, रफिकभाई शेख, राधिका मारूती हजारे, भाऊसाहेब महारनवर, मंगल आव्हाड, नंदा कल्याण आव्हाड, हरिदास हजारे, सारिका रोडे, जयश्री कोल्हे या सर्वांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी भव्य सत्कार चोंडी येथे संपन्न झाला.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद दादा कार्ले, संचालक सचिन घुमरे, डाॅ गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, सोमनाथ पाचरणे, डाॅ सुनिल गावडे, तुषार पवार, अनिल गदादे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख मुरली अण्णा हजारे, काकासाहेब वाळुंजकर, दशरथ कोल्हे, राहुल पाटील, सोमनाथ वाळुंजकर, तुकाराम भाऊसाहेब हजारे, प्रमोद कोल्हे, एकनाथ हजारे, अनंता लेकुरवाळे, दीपक देवमाने, महेंद्र खेत्रे, सावता हजारे, पांडुरंग रोडे, डॉ ईश्वर हजारे, तानाजी पवार, राहुल मासोळे, अनिल माने, नाना कोल्हे, राष्ट्रपाल आव्हाड सह आदी उपस्थित होते.