संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे-वरवंडी शिवाच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला व ट्रकचालक संतोष राणू मोटे हे जागेवरच मृत झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेने संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, एम एच १४ बी जे २२५१ या क्रमांकाची ट्रक ऊस भरुन संगमनेर साखर कारखान्याकडे जात असताना खांबे-वरवंडी शिवा जवळील रस्ता क्रॉस करुन गेलेल्या विदयुत वाहिनीला ऊसाने भरलेला ट्रकचे घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रकवर करंट उतरुन ऊसाच्या ट्रकने पेट घेतला.
संगमनेर साखर कारखान्यामधून तातडीने अग्नीशामकला पाचरण करण्यात आल्याने पुढील होणारे मोठे नुकसान टळले मात्र दुर्दवी चालक संतोष मोटे हे जागेवरचं शॉक बसून मृत झाले.येथील स्थानिक रहिवाशांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करत गाडीला लागलेली आग विझवण्यात आली आहे.