Maharashtra247

जिल्ह्यातून दोन वर्ष हद्दपार केलेला आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर (दि.१० फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्ष हद्दपार केलेला आरोपी नगर शहरात फिरत असताना कोतवाली पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.

बातमीची हकीकत अशी की,दि.09 फेब्रुवारी रोजी डायल 112 MDT वर अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार असलेला इसम नामे आकाश उर्फ अक्षय जिजाराम साबळे (रा.रामवाडी) हा समता कॉलनी,विनायक नगर, बुरुडगाव रोड येथे आला आहे अशी बातमी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती.पो.निरी/दराडे यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करिता असलेले पोलीस अंमलदार यांना कारवाई करण्यास सांगितले.

पोलिस अमलदार सदर ठिकाणी कारवाई करण्याकरता गेले असता हद्दपार इसम हा मिळुन आला व त्यास ताब्यात घेतले.महाराष्ट्र शासनाची कोणतीही लेखी पुर्वपरवानगी न घेता अहमदनगर जिल्ह्याचे स्थळसिमेच्या हद्दीतुन हद्दपार केलेले असताना सदरील इसम मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द पोकॉ/सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन भादंविक.188 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 142 नुसार कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक/ प्रविण पाटील,पोना/अविनाश वाकचौरे,पोकॉ/दिपक रोहकले,पोकॉ/तान्हाजी पवार,पोकॉ/सत्यजित शिंदे, पोकॉ/सुरज कदम यांनी केली आहे

You cannot copy content of this page