अहमदनगर (दि.१० फेब्रुवारी):-संगमनेर येथील वाळू तस्कराला 3 लाख 50 हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खासगी वाहनानं संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली,की मोईन खुशींद हसन शेख हा त्याच्या पिकअपमधून मोठया पुलाजवळ,पूना नाका, संगमनेर येथून प्रवरा नदीपात्रात वाळूचा उपसा करुन रस्त्यानं शासकीय वाळूची विना परवाना बेकायदा चोरुन वाहतूक करत आहे.
ही माहिती मिळाल्यानं पोहेकॉ/सचिन दत्तात्रय आडबल,पोहेकॉ/दत्तात्रय विठठल गव्हाणे,पोकॉ/किशोर आबासाहेब शिरसाठ, व पोहेकॉ/लुमा भांगरे,पोकॉ/हरिचंद्र बांडे व इतर कर्मचारी (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा) हे खासगी वाहनाने प्रवरा नदीपात्रात,मोठया पुलाजवळ,संगमनेर येथे जावून मिळालेल्या बातमीनुसार प्रवरा नदीपात्रात पिकअपमध्ये मजुरांच्या सहाय्याने शासकीय वाळू उपसा करुन भरताना दिसले. पोलिसांनी खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकला असता नमूद लेबर हे अंधाराचा फायदा घेऊन काटवनात पळून गेले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर ठिकाणी असलेल्या पिकअपमध्ये बसलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून चालकास त्याचे नाव १) मुज्जमिल लियाकत शेख,रा रेहमान नगर,संगमनेर, व त्याचे शेजारी बसलेल्या इसमाने स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता चोरुन वाळू उपसा करुन वाहतुक करत असल्याचे सांगितले.
पिकअप चालक मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्रवरा नदीपात्रात पर्यावरणाला हानी पोहोचेल,अशी शासकीय वाळू उपसा करून चोरी करून वाहतुक करतांना मिळून आला.सदर डंपर मधील शासकीय वाळू ३ लाख १०,०००/- रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप नं. एम एय १४ ए एस २१४३ असा झालेला व अंदाजे १० हजार रुपये किंमतीची १ ब्रास वाळू किंमत अंदाजे ३ लाख ५० हजार किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने दोन पंचांसमक्ष सदर पिकअप य शासकीय वाळचा पंचनामा पोलीस हेडकॉन्स्टेबल लुमा भांगरे, यांनी करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन आरोपी व मुददेमाल ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणला.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/सचिन दत्तात्रय आडबल,पोहेकॉ/दत्तात्रय विठठल गव्हाणे,पोलीस कर्मचारी किशोर आबासाहेब शिरसाठ,पोहेकॉ/लुमा भांगरे,पोकॉ/हरिचंद्र बांडे व इतर कर्मचारी यांनी केली.