Maharashtra247

बाल संस्कार केंद्रात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील बुध्द विहारात बाल संस्कार केंद्रात त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बहुजनांची आई, करुणेचा महासागर माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.त्रिशरण व पंचशील सामूहिकरीत्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे आपल्या भाषणात म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे.

रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली.रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते,हे नाकारता येत नाही. स्वत: झिजून रमाईने आपणा सर्वांना मायेची सावली दिली.भारत देश जो उभा आहे,तो आई रमाईच्या असीम त्यागामुळे आहे. भारतीय संविधानामुळे आपल्याला जगण्यासाठी मोकळा श्वास मिळाला व हा श्वास मिळवून देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आई रमाईमुळेच घडले. जीने स्वत:कष्ट केले पण आपल्या करोडो लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य दिले.माता रमाई ही करुणेचा महासागर होती.

प्रास्ताविक भाषण बौद्धाचार्य गौतम भालेराव यांनी केले.ते म्हणाले आई रमाईचा त्याग अवर्णनीय आहे.त्याला शब्दात मांडणे शक्य नाही.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे.मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार ४ एप्रिल १९०६ रोजी रमाईचे बाबासाहेबांच्या सोबत लग्न झाले. रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील.एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते.तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला.पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील करोडो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे.हिवरगाव पावसा बाल संस्कार केंद्रा मार्फत विद्यार्थांना धम्म संस्कार वर्गाचे दर रविवारी आयोजन केले जात आहे.विध्यार्थाना वंदना सूत्र पठन सराव करून घेतला जात आहे.सदर उपक्रमास विद्यार्थांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

भीम शाहीर मधुकर भालेराव यांचा भीम गीतांचा कार्यक्रमास उस्पुर्त प्रतिसाद मिळाला.या कार्याक्रमास शिवसेना तालुका उपप्रमुख भीमाशंकर पावसे,ग्रामपंचायत सदस्य दिनकर भालेराव,कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, यादव भालेराव,बाळासाहेब भालेराव,बच्चन भालेराव,लहानू भालेराव,मन्सूर इनामदार,सुयोग भालेराव,राजेंद्र दारोळे,यांच्या सह बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला बौद्ध बांधव तसेच ग्रामस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र भालेराव,प्रशांत वाकचौरे, सुनील शेटे,दीपक भालेराव,सागर भालेराव,राहुल भालेराव,संजय भालेराव,प्रल्हाद मोकळ,रायबान भालेराव, प्रवीण गडाख,अंकुश कोळगे, संतोष भालेराव,विकास दारोळे, महेंद्र भालेराव,राजेंद्र भालेराव,उत्तम गायकवाड, आयुष गायकवाड,आर्यन पठारे, सार्थक संसारे,सचिन भालेराव,रवींद्र मिसाळ यांनी प्रयत्न केले.

You cannot copy content of this page