
अहमदनगर (दि.१० फेब्रुवारी):-माणिक चौकातील साई मोबाईल शॉपी येथे शॉपी चे मालक श्री.पंकज लक्ष्मीचंद मोटवानी (रा.तारकपुर) हे नेहमीप्रमाणे दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना बॉक्स मधील मोबाईल काढून दाखवीत होते.दरम्यान कुणीतरी गर्दीचा फायदा घेत दुकानातून रेड मी कंपनीचा १४,००० हजार रु.किमतीचा मोबाईल चोरून नेला होता.
या बाबत मोबाईल शॉपीचे मालक श्री.पंकज लक्ष्मीचंद मोटवानी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या बाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोउपनि/प्रवीण पाटील यांना व अंमलदारांना गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल हस्तगत करण्यास सांगितले. पोलिसांनी तपास करत चोरी गेलेला मोबाईल हा इसमनामे गोपाळ सावळेराम गायकवाड (रा.तपोवन रोड) यांच्या ताब्यात मिळून आला त्याच क्षणी मुद्देमालासह गायकवाड याला अटक केले.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक/ प्रविण पाटील,पोहेकॉ/शाहीद शेख,पोना/अविनाश वाकचोरे,मपोना/वंदना काळे, पोकॉ/दिपक रोहोकले, पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/ सत्यजित शिदे,पोकॉ/महेश पवार मोबाईल सेलचे पोकॉ/ राहल गुंडू,एसडीपीओ कार्यालय नगर शहर मोबाईल सेलच्या मपोकॉ/सोनल भागवत यांनी केली आहे.