
अहमदनगर (दि.१० फेब्रुवारी):-अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनी मध्ये दोन अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राण घातक हल्ला केला आहे.
या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडले आहे.मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळले नसून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.हि घटना आज सायंकाळी दहाच्या सुमारास घडली असून घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले आहे.या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.