
अहमदनगर (दि.११ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या दाम्पत्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आज पुणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
काँग्रेसला रामराम ठोकत नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याने अहमदनगर काँग्रेस पक्षासह पक्षाचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे हे मातब्बर नेते मानले जात आहे.
अशातच नागवडे दाम्पत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने येणाऱ्या विधानसभेचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना नागवडे दाम्पत्य हे टेन्शन ठरणार आहे? श्रीगोंद्यात विधानसभेची जागा ही भाजपाच्या वाट्याला आहे,मात्र अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपासोबत सत्तेत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला आपल्या वाटेच्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावा लागणार आहेत.