
पाथर्डी प्रतिनिधी:-पाथर्डी तालुक्यातील वैजु बाभूळगावच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सरपंच ज्योती घोरपडे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सोहळा रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी माऊली सभागृह,सावेडी अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला.स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार वैजु बाभूळगावच्या सर्वांगीण विकासात मोलाची भुमिका बजावत अग्रेसर राहणाऱ्या सरपंच ज्योती घोरपडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार,खासदार भाऊसाहेब वाकचौरे,समाजसेवक यादवराव पावसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी वैजू बाबुळगावचे उपसरपंच रावसाहेब लोहकरे,संतोष घोरपडे,माजी सरपंच मीराबाई भवार, नम्रता गुंजाळ,द्वारका घोरपडे,ग्रामपंचायत सदस्य मनेष घोरपडे,भरत घोरपडे,नामदेव नरवडे,प्रतीक घोरपडे,राजेंद्र गुंजाळ,नंदकिशोर गुंजाळ मेजर,सुधाकर गुंजाळ,सोपान आप्पासाहेब वांढेकर,अमोल फुलशेटे इ.उपस्थित होते.यावेळी वैजू बाबळगाव येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.वैजु बाबुळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सरपंच ज्योती घोरपडे यांना आदर्श सरपंच पुररस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वैजू बाबुळगाव पंचक्रोशीसह पाथर्डी तालुक्यातून अभिनंदन होत आहे.