Maharashtra247

अन् त्या पक्षाचे प्राण विद्यार्थ्यांनी असे वाचवले…जुने नायगाव शाळेतील घटना..

श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशिनकर):-सोमवार दि.४ मार्च रोजी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत भर उन्हात शाळेच्या मैदानातील स्टेजवर एक पक्षी शाळेच्या नावाच्या बोर्डला धडकून स्टेजवर खाली पडला.विद्यार्थ्यांनी त्या पक्षाला पाहिले.विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांच्याकडे धाव घेतली.

“सर एक पक्षी बोर्डला धडकून स्टेजवर खाली जोरात पडला आहे,”असे सांगितले.तेव्हा विद्यार्थ्यांना सरांनी पक्षाला उचलून घेऊन या आणि त्याला पाणी पाजा असे सांगितले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पक्षाबद्दल खूप काळजी दिसून आली.विद्यार्थ्यांनी पक्षाला तळहातावर उचलून घेतले.पक्ष्याला पाण्याच्या टाकीवर घेऊन गेले.एका ग्लासात पाणी घेऊन विद्यार्थ्यांनी त्या पक्षाला पाणी पाजले.त्याला गोंजराले.सरांनी विद्यार्थ्यांना विचारले,”अरे हा पक्षी कोणता आहे?” विद्यार्थी म्हटले हा पावशा पक्षी आहे.विद्यार्थ्यांनी त्याला खाली जमिनीवर ठेवले.त्याच्या पायाला थोडीशी इजा झाली होती.

विद्यार्थी म्हंटले,”सर आता या पक्ष्याला कोठे ठेवायचे?”सरांनी विद्यार्थ्यांना त्या पक्षाला सावलीत ठेवण्यास सांगितले.विद्यार्थी कुतूहलाने त्या पक्षाकडे पाहत होते आणि विचार करत होते की त्या पक्षाला उडता येईल की नाही? परंतु थोड्या वेळानेच त्या घाबरलेल्या पक्षाने आकाशामध्ये उंच भरारी घेतली आणि सर्व विद्यार्थी व शिक्षकांनाही समाधान वाटले.असे ग्रामीण भागातील नायगाव जुने या प्राथमिक शाळेत हा एक संस्काराचा पाठ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात गिरविला.प्राणीमांत्रावर दया करणे हा संस्कार शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष रुजविला आणि विद्यार्थ्यांनी आचरणातही आणला.त्यामुळे एका पक्षाचा प्राण वाचला…असे संस्कारक्षम विद्यार्थी तयार होणे ही काळाची खूप गरज आहे,असे गौरोद्गार शाळेचे मुख्याध्यापक वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांबाबत काढले.

You cannot copy content of this page