सैन्यदलात अग्निविरांसाठी सुवर्णसंधी भरतीसाठी इच्छुकांनी २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत
अहमदनगर (दि.५मार्च):-भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च,२०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त),जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सैन्यदलात अग्निवीर जीडी,अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी आणि ८ वी पास), मिलिटरी पोलिसांसाठी अग्निवीर महिला प्रवर्ग आणि एनए सप्टेंबर मधील नियमित प्रवेशासाठी अर्ज खुले आहेत. फार्मा,टप्पा 01 मध्ये उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना सविस्तरपणे वाचाव्यात. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार,तांत्रिक दृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट क्रीडा व्यक्ती आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापात सूट दिली जाईल.
सर्व संबंधित तपशील अधिसूचनेत दिलेले आहेत, लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना संबंधित एआरओद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल.आता प्रथमच अनुकूलता चाचणी देखील समाविष्ट करण्यात आली आहे.जी वैद्यकीय चाचणीपूर्वी घेतलो जाईल. अनुकूलता चाचणीसाठी उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी पुरेशा बॅटरी लाइफसह फंक्शनल स्मार्टफोन आणि दोन जीबी डेटा आणणे आवश्यक असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.