Maharashtra247

मुकादमावर गोळीबार करणारा चिंग्या जेरबंद;साथीदार पकडला उसाच्या शेतातून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (दि.५ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत आरोपी चिंग्यास त्याच्या साथीदारासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे.

बातमीची हकिगत अशी की,दि.03 फेब्रुवारी रोजी फिर्यादी श्री.आबेद बाबुलाल पठाण (रा.भवरवाडी,ता. जामखेड) हे लेबर मुकादम असुन त्यांचे कडील मजुर लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड) यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दिड वर्षापुर्वी मारहाण केल्याने त्याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याचे साथीदारासह येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन,जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत केली याबाबत जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 101/2024 भादविक 307,504,34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हि घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवुन मिळुन आल्यास ताब्यात घेवून आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देवुन 2 दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेताना वर नमुद गुन्ह्यातील आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपुन बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन पंचाना सोबत घेवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथाकने लागलीच मिळालेल्या माहिती नुसार विंचरणा नदीपात्रा जवळील काटवनात जावुन सापळा रचुन जवळपास 2 तास काटवनात शोध घेतला असता आरोपी नामे कुणाल जया पवार हा ऊसाचे शेतात पळुन जाताना दिसला त्यास ऊसाचे शेतातून ताब्यात घेतले.त्यास त्याचा साथीदार नामे अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याचे बाबत माहिती घेवुन त्यास वाकी, ता.जामखेड येथुन ताब्यात घेण्यात आले.

व जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले,पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस श्री.प्रशांत खैरे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग श्री.विवेकानंद वाखारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे,रविंद्र कर्डीले,विश्वास बेरड,विशाल दळवी,रोहित मिसाळ,बबन मखरे,देवेंद्र शेलार,विजय ठोंबरे,प्रमोद जाधव,मेघराज कोल्हे,रणजीत जाधव,प्रशांत राठोड,उमाकांत गावडे,भरत बुधवंत यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page