केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांचा ५ मार्च रोजी जिल्ह्यात झंझावाती दौरा;जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून भव्य स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर येथील बसस्थानका समोर आरपीआयच्या वतीने सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे ५ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले व महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री तथा केंद्रीय कार्यकारणी सेक्रेटरी अविनाश महातेकर,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे,युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे,महिला आघाडीच्या आशाताई लांडगे यांच्या सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांचा कार्यक्रम मंगळवार दि.५ मार्च २०२४ रोजी सायं ६ वा. संगमनेर बसस्थानक परिसर येथे होणार आहे.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या अकोले,कोतूळ,संगमनेर झंझावाती दौऱ्यामध्ये कार्यकर्ते ठीक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून फटाक्याच्या अतिषबाजीत भव्य असे स्वागत करणार आहेत. आरपीआय राज्याचे नेते विजयराव वाकचौरे,बाळासाहेब गायकवाड,दिपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे सुयोग्य असे नियोजन केले आहे.सदर कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे प्रचंड मेहनत घेत आहे.केंद्रीयमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अकोले,कोतूळ,संगमनेर झंझावाती दौऱ्यामध्ये दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे व युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्याक्रमाच्या तयारी करिता तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात,युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे सह संगमनेर तालुका आरपीआयचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली.तसेच अकोले येथील कार्यक्रमास आणि संगमनेर येथील सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.