Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):-राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत हिवरगाव पावसा परिसरात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.याअंतर्गत गावातील पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस पाजले.हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे, कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे उपाध्यक्ष रंजना भालेराव,गणेश पावसे,नितीनचंद्र भालेराव यांच्या हस्ते  पोलिओचा डोस बालकांना पाजून लसीकरणास सुरुवास झाली.तसेच नाशिक पुणे महामार्गावर प्रवास करणारे बालके लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी टोल प्लाझा येथे दोन बूथ लावून बलकांचे लसीकरण केले.यावेळी आरोग्यसेविका नेहे एन.पी.,अंगणवाडी सेविका रंजना पावसे,अशासेविका अलका पावसे यांच्या सह महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.पवनकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहिमेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.या पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे एक बूथ,उंबरवाडी अंगणवाडी येथे एक बूथ,अरखाडी अंगणवाडी येथे एक बूथ,हिवरगाव टोल प्लाझा येथे दोन बूथ असे एकूण पाच बूथ वर हिवरगाव पावसा येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविली जाते. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.या मोहिमेत जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील, त्यांना ५ ते ७ मार्च दरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीमद्वारे डोस दिला जाईल.

पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील बूथवर आरोग्यसेविका नेहे एन.पी.,अंगणवाडी सेविका रंजना पावसे,अशासेविका अलका पावसे,उंबरवाडी अंगणवाडी येथील बूथवर अंगणवाडी सेविका दिपाली वाकचौरे, मदतनीस सुजाता पावसे,अरखडी अंगणवाडी येथील बूथवर अंगणवाडी सेविका सोनाली पावसे,मदतनीस माधुरी भालेराव,हिवरगाव पावसा टोल प्लाझा येथील एका बूथवर आरोग्यसेविका दिपाली मुन्तोडे,यमुना पावसे तर दुसऱ्या बुथवर सीताबाई भालेराव,अशासेविका संगीता पावसे यांची नियुक्ती करण्यात आली होती.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये हिवरगाव पावसा गावातील पालकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाल्याची अशी माहिती हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांनी दिली.

You cannot copy content of this page