Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तब्बल १३ लाख रुपये किंमतीचे ७१० किलो गोमांस जप्त तर ५७ गोवंशीय जिवंत जनावरांची केली सुटका 

अहमदनगर (दि.२९ मे):-कर्जत तालुक्यातील राशिन येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्बल १३ लाख ११ हजार/रुपये किंमतीचे ७१० किलो गोमांस,५७ गोवंशीय जिवंत जनावरे व २ पिकअप असा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे,विश्वास बेरड,विशाल दळवी,संदीप दरंदले,सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ,बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ व अरुण मोरे यांना पेट्रोलिंग करुन गोमास वाहतुक व विक्री करणारे इसमांची माहिती काढुन मिळुन आल्यास कारवाई करण्याच्या सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक कर्जत परिसरात गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेत असताना पोनि/श्री.आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला,राशिन, ता.कर्जत येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल चालु आहे आता गेल्यास गोमास व कत्तलीसाठी आणलेली जिवंत जनावरे मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन आवश्यक कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी कुरेशी मोहल्ला, राशिन,ता.कर्जत येथे जावुन खात्री करता एक इसम घरा समोरील पत्र्याचे शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करताना दिसला, पथक सदर इसमास पकडण्याचे तयारीत असतांना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच तो गल्ली बोळीचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. त्यानंतर पथकाने पळुन गेलेल्या इसमाचे राहते घराचे आजु बाजूस त्याचे नाव गांव विचारले असता त्याचे नाव शाहबाज आयुब कुरेशी रा.कुरेशी मोहल्ला, राशिन,ता.कर्जत (फरार) असे असल्याचे समजले. सदर इसमाचे घरासमोरील पत्र्याचे शेड व आजुबाजूचे वाहनांची पाहणी केली असता जनावरांची कत्तल करुन ठेवलेले गोमास व कत्तलीच्या उद्देशाने मोकळ्या जागेत व 2 पिकअप वाहनात लहान मोठी जिवंत जनावरे मिळुन आली त्याबाबत विचारणा करता सदरची जिवंत जनावरे ही इसम नामे सोहेल कुरेशी (फरार) व सुलतान कुरेशी (फरार) दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला,राशिन, ता.कर्जत यांचे मालकीची असुन कत्तली करीता आणलेली आहेत असे समजले.

नमुद फरार आरोपीचे घरा समोरील शेडमध्ये 1,42,000/- रुपये किंमतीचे 710 किलो गोमास, 4,69,000/- रुपये किंमतीची 57 लहान मोठी जिवंत गोवंशीय जनावरे व 7,00,000/- रुपये किंमतीचे 2 मालवाहु पिकअप असा एकुण 13,11,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कर्जत पो.स्टे.गु.र.नं. 371/2024 प्राण्यांना निर्दयतेने वागवीनेचे कलम 11 (1), 11 (1)(a), 11 (1)(d), 11 (1)(e), 11 (1)(h), 11 (1)(I) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क 9, 5, 5 (अ), 5 (ब),5 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन.पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page