शेततळ्यात बुडालेल्या बालकांच्या घातपाताची चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव
संगमनेर (नितीन भालेराव):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दि.१७ एप्रिल रोजी रितेश सारंगधर पावसे,प्रणव सारंगधर पावसे या सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालेला नसून हा घातपताचा प्रकार आहे.रितेश सारंगधर पावसे,प्रणव सारंगधर पावसे या दोन्ही भावंडांचा घातपतच झालेला आहे.
संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद आहे,अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्यामुळे संतप्त ग्रामस्तांनी हिवरगाव पावसा टोल प्लाझा येथे रस्ता रोको केला.हिवरगाव पावसा टोल प्लाझा येथील दोन्ही बाजूने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.रस्ता रोको प्रसंगी ग्रामस्तांना मार्गदर्शन करताना आर.पी.आय चे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हासंपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी शेततळ्यात बुडालेल्या बालकांच्या घातपाताची चौकशीसाठी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री श्री.रामदास आठवले,उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांची चौंडी दौऱ्यात भेट घेणार आहे.
आणि संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे.तालुका पोलीस स्टेशन यांनी गुन्हेगारांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई न केल्यास ६ जून रोजी पुन्हा हिवरगाव पावसा ग्रामस्तांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीकांत भालेराव यांनी पोलीस प्रशासन व अधिकारी यांच्या कार्य पद्धतीवर आणि भूमिकेवर शंका व्यक्त केली.पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यासाठी हलगर्जीपणा करत आहे.गंभीर स्वरुपाची घटना घडूनही पोलीस निरीक्षक घटनास्थळी भेट देण्यासाठी आले नाही.हि मोठी गंभीर बाबा आहे.तर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ म्हणाले कि,रितेश सारंगधर पावसे,प्रणव सारंगधर पावसे या सख्या भावंडांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्त व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशसकीय अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिली आहे.प्रशासकीय पातळीवर संघर्ष चालू आहे.परंतु पोलीस प्रशासन नातेवाईकांना व गावकऱ्यांना पुरावे आणून देण्याची मागणी करत आहे.जर नातेवाईक व गावकऱ्यांनी पुरावे शोधावे तर पोलीस प्रशासन काय काम करत आहे.
त्यांची काय जबाबदारी आहे,संगमनेर तालुक्यात कायदा व प्रशासन कोलमडलेली आहे.कायद्याचा वचक राहिला नाही.रितेश व प्रणव यांच्या घातपाताची तातडीने चौकशी करून गुन्हेगारांला दंडात्मक शिक्षा होई पर्यंत हिवरगाव पावसा ग्रामस्त लढा देणार आहे.राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे म्हणाले कि,शेततळ्या जवळ जाण्यासाठी जागा नाही.ही लहान बालके त्या शेततळ्या जवळ कशी जातील मोठा प्रश्न आहे.डी.वाय.एस.पी.तसेच पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांना भेटून न्यायसाठी निवेदन दिले.हा घातपाताचा प्रकार आहे,मुलांना न्याय मिळाला पाहिजे,पोलीस प्रशासनाचे काम आहे गुन्हेगारांचा शोध घेणे.गुन्हेगार शोधले जात नाही हि खेद जनक बाब आहे.ग्रामस्तांच्या ऐकी मुळे मुलांना न्याय मिळेल,एक दिलाने न्यायसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.या रस्ता रोको प्रसंगी सरपंच सुभाष गडाख,जेष्ठ पत्रकार यादवराव पावसे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ.विजय पावसे,मा.पोलीस पाटील माथाजी पावसे,वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,देवगड देवस्थान विश्वस्त उत्तम जाधव,गोरक्ष पावसे,कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे,भास्करराव पावसे,भिका नरहरी,मुलांचे आजोबा गंगाधर पावसे व इतर नातेवाईक तसेच मोठ्या प्रमाणात हिवरगाव पावसा ग्रामस्त उपस्थितीत होते.