वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी बरखास्त
अहमदनगर (दि.२० जुन प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले असून लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.