Maharashtra247

माणुसकीला काळीमा फासणारी घटना…प्रियकराच्या मदतीने आईने केला दोघा मुलांचा खून

संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंगधर पावसे आणि प्रणव पावसे या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान उघड झाले आहे.

दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी बुधवारी (दि.१९ जुलै) रोजी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा,ता. संगमनेर) आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे (रा.सावरगाव तळ, ता.संगमनेर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे.

रितेश (वय १२) आणि प्रणव (वय ८) या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे.त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा,या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी तसेच आरपीआय आठवले गटाच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला.

पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले. मयत मुलांची आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यात प्रेमसंबंध होते.या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अखेर गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले.

You cannot copy content of this page