प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते: श्रीनिवास बोज्जा;पद्मशाली पंच कमिटी व देवस्थानच्या वतीने सिरसुल याचा सत्कार
नगर (दि.२० जुन प्रतिनिधी):-पद्मशाली समाजातील युवक समर्थ सिरसुल याने शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सी.ई.टी परीक्षेत 99.79%मिळवून उत्तीर्ण झाला.म्हणून पंचकमिटी पद्मशाली समाज व मार्कंडेय देवस्थानच्या वतीने त्याला मार्कंडेय महामुनीची मूर्ती देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, शहर सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय रासकोंडा, उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल, सह सेक्रेटरी विनोद बोगा, विश्वस्त अमीत बिल्ला, ऍड.राजू गाली, गणेश चेन्नुर, माजी अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, पुरशोत्तम सब्बन, विशाल येमुल, डॉ. चंद्रकांत सिरसूल, सौ. विजया सिरसुल, कु . श्रूष्टी सिरसुल, दत्तात्रय शिरापुरी व सौ. विजया शिरापुरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले युवकांनी ध्येय ठरवून शिक्षण घ्यावे म्हणजे त्याने ठरवलेले उद्देश पुर्ण होतील या साठी प्रत्येक युवकाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, आज पद्मशाली समाजातील अनेक युवक एम.पी.एस.सी तसेच यू.पी.एस.सी अशा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून क्लास वन अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. ही बाब समाजासाठी भूषणावह आहे. या वेळी समर्थ सिरसुल यास समजाच्या वतीने गणेश विद्ये, दत्तात्रय रासकोंडा यांनी शुभेच्छा दिल्यात, या वेळी समर्थचे वडील डॉ. सिरसुल यांनी समाजाच्या वतीने माझ्या मुलाचा सन्मान केला. ही गोष्ट माझ्या कुटुंबासाठी अभिमानाची असून मी नेहमीच समाजाचा ऋणी राहील. शेवटी समाजाचे उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.