पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर अत्याचार कारमधून नेले पळवून…
अहमदनगर (दि.२३ जुलै ) प्रतिनिधी:-पती-पत्नीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीला कारमधून पळून नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना २१ जुन ते २४ जून २०२४ दरम्यान घडला आहे. फिर्यादी महिलाही नगर तालुक्यातील एका गावात पतीसोबत राहत आहे.
२१ जुन २०२४ रोजी सायंकाळी आरोपी विकी भोसले हा त्याच्याकडील कार मधून फिर्यादी महिलेच्या घरी आला व पीडित महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली व फिर्यादीला बळजबरी कारमध्ये बसविले व कार मधून घेऊन गेला तसेच फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केला.या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.