Maharashtra247

पत्नीच्या खुनाच्या गुन्हयात जन्पठेपेची शिक्षा लागलेल्या पतीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद तब्बल १९ वर्षापासुन होता फरार 

 

अहमदनगर (दि.२ सप्टेंबर):-पत्नीच्या खुनाच्या गुन्हयात जन्पठेपेची शिक्षा लागलेला व तब्बल १९ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,आरोपी नामे मच्छिंद्र शंकर कदम (रा.मांजरसुंबा ता.जि.अहमदनगर) याने त्याची पत्नी सौ.आशाबाई उर्फ बायजाबाई मच्छिंद्र कदम हिने माहेरून १५ हजार/-रूपये रोख रक्कम आणावेत या कारणावरून तिचा छळ करून तिस कुऱ्हाडीचे दांडयाने मारहाण करून,तिस विष पाजुन जीवे ठार मारले होते.या घटनेबाबत बाळासाहेब हिंदेराव ससे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन एमआयडीसी पोस्टे येथे गु.र.नं.१०७/१९९५ भादविक ३०२,४९८ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे मच्छिंद्र शंकर कदम यास तात्काळ अटक करण्यात आली होती. आरोपी विरुध्द सबळ पुरावा गोळा करुन मुदतीत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणाची न्यायालयात नियमित सुनावणी होवुन जिल्हा व सत्र न्यायालय,अहमदनगर यांनी आरोपी मच्छिंद्र शंकर कदम यास दि.३१/०७/१९९६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.सदर शिक्षे विरुध्द आरोपीने उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे अपील दाखल केले होते.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दि.६/७/२००५ रोजी अपीलाची सुनावणी होवुन उच्च न्यायालयाने ही आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली होती.तेव्हा पासुन सदर आरोपी फरार झालेला होता.

सदर फरार आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.

पथकातील पोसई/मनोहर शेजवळ,पोलीस अंमलदार शरद बुधवंत, सुरेश माळी,प्रमोद जाधव अशांनी मिळुन आरोपीचा शोध घेत असतांना गुन्हयातील फिर्यादी,साक्षीदार यांचेशी संपर्क केला व आरोपीचे वास्तव्या व कामकाजा बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.परंतु काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.दरम्यान आरोपीचे मुळ गावी मांजरसुंबा व परिसरात जावुन माहिती घेत असतांना आरोपी हा वारंवार वास्तव्याचे ठिकाणे बदलुन राहतो अशी माहिती मिळत होती.पोनि/दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,आरोपी मच्छिंद्र शंकर कदम हा वांबोरी शासकीय विश्रामगृह येथे थांबलेला आहे.अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी वांबोरी शासकीय विश्रामगृह येथे जाऊन वांबोरी दुरक्षेत्राचे पोहेकॉ/व्ही.डी.पारधी व पोना/सुनिल निकम यांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेतले.

त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मच्छिंद्र शंकर कदम (रा.डोंगरगण, ता.अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले, आरोपीची खात्री करून त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन हजर करण्यात आले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

You cannot copy content of this page