इंजि.यश शहा यांची महा.शासनाच्या भ.महावीर स्वामी निर्वाण कल्याणक महोत्सव-अशासकीय जिल्हा समिती सदस्य पदी मंत्री लोढा यांच्या आदेशाने नियुक्ती
अहमदनगर (दि.३ सप्टेंबर):-भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा,जगा आणि जगू द्या ही शिकवण दिली.या शिकवणीचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने २४ वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये समिती गठीत करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात इंजिनीयर यश प्रमोद शहा यांची स्वतःमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशाने जिल्हास्तरीय अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.याचे सुधारित आदेश महाराष्ट्र शासन,जिल्हा प्रशासन व संबंधित सर्व विभागांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील पाठवण्यात आले आहेत.इंजि.यश शहा यांनी अतिशय कमी वयात केलेल्या विविध उल्लेखनीय सामाजिक कार्यांची दखल या निमित्ताने घेतली गेली.इंजि.यश शहा हे अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख,अखिल भारतीय जैन दिवाकर मंच राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष,जैन अल्पसंख्यांक महासंघ महाराष्ट्र समिती सदस्य, जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा लीडर,तसेच मिशन सेफ विहार संस्थापक अध्यक्ष, संचालक आर्किटेक इंजिनिअर असोसिएशन, सावेडी व्यापारी असोसिएशन संचालक, ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया एच ए डब्ल्यू आर सदस्य अशा विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत.
व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन ॲण्ड इंटिरियर या नावाने बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करत आहे.शहा यांच्या निवडीबद्दल जैन समाजाच्या अनेक साधु साध्वी गुरु भगवंतांनी तसेच विविध सामाजिक संघटना व अनेक मान्यवरांनी विशेष कौतुक केले. ललित गांधी,संदीप भंडारी,राजेंद्र शहा,पलक शहा व इतर मान्यवरांनी फोनद्वारे अभिनंदन केले.मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला,शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा राज्य समितीच्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,आयुक्त महानगरपालिका,मुख्याधिकारी नगरपालिका,शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी,शाळा व्यवस्थापन,जिल्ह्यातील जैन संघ यांच्याशी समन्वय करून विविध कार्यक्रमाचे अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी सदस्य यश शहा यांनी सांगितले.महाराष्ट्र शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्पर्धांसाठी पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमात समाजातील सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याची विशेष आग्रही विनंती जिल्हावासियांना यश शहा यांनी केली आहे.