महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंती उत्सवानिमित्त भव्य गायनाचा कार्यक्रम संपन्न..दिग्गज गायक कलाकारांची हजेरी
नाशिक (प्रतिनिधी/आशा मोरे):-महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंच आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 102 व्या जयंती उत्सवानिमित्त दि.३१ ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन तीन पुतळे पेट्रोल पंचवटी येथे भव्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल ढिकले,बाळासाहेब कर्डक,कविताताई कर्डक,निवृत्ती बाबा पगारे,वसंतराव पगारे, बाळासाहेब वाघमारे शंकर हिरे उपस्थित होते.चेतन लोखंडे झी युवा सिंगर मराठी,इंडियन आयडल झी युवा सिंगर तसेच ‘गावा मध्ये गाव आहे ते महू गाव तिथे जन्मले भीमराव सखे बाई ग’ या भीमगीताचे गायक संतोष जोंधळे,भारती राऊत सुनील खरे,मेघालंद जाधव,सविता दिगंबर वाघ,जयपाल दिवरे,विश्वास गवळे,अनिल लोहनार,यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष हरीश भालेराव,उपाध्यक्ष शाहीर गायकवाड,वामनराव गायकवाड, नवनाथ काळे,अशोक वाघमारे,प्रज्ञा सोनवणे काळे,नर्मदा भोकरे यांनी व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व उज्वल मित्र मंडळ महात्मा फुले नगर पेठरोड यांचे मोलाचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले.यावेळी अध्यक्ष हरीश भालेराव,उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,शाहीर माधवराव गायकवाड,नवनाथ काळे,अशोक वाघमारे, फुलचंद जाधव,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळासाहेब कर्डक, बाळासाहेब वाघमारे, विश्वगामी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आशा मोरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.