Maharashtra247

मी हिंदूंचा गब्बर मी जर चालायला लागलो तर लोकं दारंच बंद करतात नितेश राणेंचं अहमदनगरमध्ये वक्तव्य

 

अहमदनगर (दि.१ सप्टेंबर):-महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचारा विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये भाजप नेते मा.आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला.यावेळी नितेश राणे म्हणाले की मी जर चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे.

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली.तर काही ठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहे.

आज अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या मोर्चात नितेश राणे म्हणाले की, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे.दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्या पैकी हे राणे कुटुंबीय आहे.बाकी कोणातच हिंमत नव्हती.

माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे.हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही.आपल्या जिभेला काही हाड नाही.पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्या समोर मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा,असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आपल्याला कोणाच्या वाकड्यात जायचं नाही.एक राणे असे करू शकतो तर मला प्रत्येकामध्ये अशी हिंमत झालेली पाहायचं आहे,असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.मालवण येथील मूर्तिकार आपटे समोर येऊ द्या,त्याला नाही आपटला तर नितेश राणे नाव सांगणार नाही,असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.आताचा विषय केवळ रामगिरी महाराजांबाबतचा नाही तर रामगिरी महाराज केवळ झाकी है पुरा हिंदू समाज बाकी है,असा संदेश काही लोकं देण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, येवला येथे आज सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज व रामगिरी महाराज यांच्या भक्त परिवारा तर्फे भव्य ‘हुंकार ‘मोर्चा काढण्यात आला.येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, महंत रामगिरी महाराजांवर यांच्यावर येवल्यात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे

You cannot copy content of this page