३ सप्टेंबर रोजी शालेय जिल्हास्तर रोल बॉल स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर (दि.१ सप्टेंबर):-दि.३ सप्टेंबर २०२४ क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तर रोल बॉल स्पर्धांचे आयोजन दि.३ सप्टेंबर २०२४ रोजी कालिका पोदार लर्न स्कूल,जामखेड येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री.प्रदीप पाटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सदर स्पर्धा १४/१७ व १९ वर्ष मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या असल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली.सर्व सहभागी शाळेचे क्रीडा शिक्षक यांनी आपला संघ घेऊन सकाळी ९ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे,येताना आपली ऑनलाईन एन्ट्री फॉर्म व एलिजिब्लिटी फॉर्म सोबत घेवून येणे बंधन कारक आहे,खेळाडूंचे सर्व प्रकारचे रक्षाकवच व पोशाख घेवून येणे बंधन कारक आहे.
या स्पर्धांसाठी कालिका पोदार स्कूलचे प्राचार्य क्रीडा शिक्षक व शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले आहे.अधिक माहिती करीता संघटना सचिव श्री.प्रदीप पाटोळे ८२७५१९१७७१,श्री. सचिन अळकुटे ९४२१५८३१६८ किंवा जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.