Maharashtra247

विदेशी दारुची वाहतुक करणारा टेम्पो पकडला लाखोंची दारू जप्त भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

 

अहिल्यानगर (दि.७ प्रतिनिधी):-ट्रान्सपोर्टच्या वाहनात लपवून विदेशी दारुची वाहतुक करणारा टेम्पो मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीसांनी पकडला आहे.

दि.07 नोव्हेंबर 2024 रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक जगदिश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की कोठला ते छत्रपती संभाजीनगर रोडने एका मालवाहु आयशर टेंम्पोतून विदेशी दारुची विनापरवाना बेकायदा वाहतुक करत आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सहा.पोलीस निरीक्षक जगदिश मुलगीर यांनी तपास पथकातील अंमलदार यांना खात्री करुन कायदेशीर कारवाई करने बाबत आदेशीत केल्याने तपास पथकातील अंमलदारांनी बातमीतील नमुद ठिकाणी दोन पंचासमक्ष जाऊन सापळा रचुन एक पांढ-या रंगाचा आयशर कंपनीचा मालवाहू टेम्पो छत्रपती संभाजीनगर कड़े जात असताना त्यास तपास पथकातील अंमलदार यांनी थांबण्याचा ईशारा देऊन वाहन मिलिटरी मस्जीद जवळ रोडचे बाजुला घेऊन गाडी चालकास गाडीतील मालाबाबत विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (रा.वडुले बुद्रुक ता. शेवगांव जि. अहिल्यानगर) असे सांगीतल्याने सदर गाड़ीतील मालाची तपासणी केली असता ट्रान्सपोर्टच्या मालाच्या खाली लपवुन ठेवलेले विविध कंपनीचे विदेशी दारुचे बॉक्स व आयशर टेम्पो अशी एकुण 6,64,640/-रू.किमतीचे अवैध्यरित्या वाहतुक करतांना मिळून आल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे,चद्रकांत माळोदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे,रवि टकले,संदिप घोडके,पोकॉ.समिर शेख,प्रमोद लहारे,अमोल आव्हाड यांनी केली आहे.

You cannot copy content of this page