Maharashtra247

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी भुतकरवाडी परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून साधला संवाद;आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामातून माणसं कमवली : अरुण काका जगताप

 

नगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून,आम्ही शहरात राबवलेल्या विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत घेऊन जात असून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामातून माणसं कमवली आहे. नागरिकांच्या सुखदुःखात सामील होऊन ऋणानुबंध जोपासण्याचे काम करत आहे. नगरकर नेहमीच चांगले काम करणाऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहत असतात.भुतकरवाडी परिसरात मिळालेला प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित झाला आहे. नगरकर देखील आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी देणार आहे. असे प्रतिपादन माजी आमदार अरुण काका जगताप यांनी केले. 

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुती चे उमेदवार संग्राम जगताप यांनी भुतकरवाडी परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी अरुण काका जगताप,आमदार संग्राम जगताप,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,मा. महापौर बाबासाहेब वाकळे,माजी नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे,दगडू मामा पवार,रवींद्र बारस्कर, वंदना ताठे, पल्लवी जाधव, बाळासाहेब जगताप, संजय सत्रे, विलास ताठे, बाळासाहेब निकम, सतीश बारस्कर, बाळासाहेब भुजबळ, संजय खामकर, संजय भुतकर, नितीन शेलार, अरुण शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

महायुती सरकारच्या माध्यमातून नगर शहरांमध्ये भरीव विकासाची कामे उभे राहत आहे. या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे शहरातील सर्वच भागात कामे सुरू आहे. त्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करीत आहे. विकास कामामुळे आमचा विजय निश्चित झाला आहे. अशी भावना माजी नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांनी व्यक्त केली. 

भुतकरवाडी ताठे मळा भिंगारदिवे मळा परिसरातील नागरिकांनी माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या उत्साहात स्वागत केले. ते पाहून मन भारावून गेले नागरिकांनी मतरुपी दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून मी केलेल्या विकास कामावर शिक्का मोर्तब होत असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page