Maharashtra247

पिण्याच्या पाण्याची बाटली दिली नाही म्हणून वेटरचा गळा आवळून खून करणारे आरोपी जेरबंद

 

अहील्यानगर (दि.८ प्रतिनिधी):-राहाता येथे दारू पिण्याच्या वादातुन हॉटेल वेटरचा गळा आवळून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पो.स्टे. यांना यश मिळाले आहे.

बातमीची हकिगत अशी की,दि.06 नोव्हेंबर 2024 रोजी फिर्यादी श्री.संतोष भाऊसाहेब कसाब (वय 43,रा.अस्तगाव, राहाता, जि.अहिल्यानगर) याचा भाऊ मयत गणेश भाऊसाहेब कसाब (वय 42,रा.नवनाथनगर, राहाता) यास राहाता गावातील छत्रपती कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील गाळयासमोर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कशाने तरी तोंडावर व डोक्यावर मारहाण करून,जबर जखमी करून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारले.याबाबत राहाता पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 529/2024 बीएनएस कलम 103 (1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

घडलेल्या ना उघड खुनाच्या गुन्हयांची माहिती प्राप्त होताच श्री.राकेश ओला,पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,फुरकान शेख,आकाश काळे,प्रमोद जाधव,प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर व राहाता पोलीस स्टेशन पोनि/रणजित गलांडे व पोलीस अंमलदार सुनिल मालनकर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.गुन्हयाचे तपासात तपास पथकाने तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन,आसपासचे साक्षीदाराकडे विचारपुस करून,तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे घटना ठिकाणाचे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून, आरोपीचा शोध घेत असताना दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अनिल विश्वनाथ मोरे व त्याचा मित्र अशांनी मिळून केलेला आहे.

आरोपी हा सध्या डोंगरगाव, ता.निफाड,जि.नाशिक येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी मिळालेली माहिती तपास पथकास देऊन,माहितीची पडताळणी करून पुढील कारवाई करणेबाबत कळविले. तपास पथकाने डोंगरगाव ता.निफाड, जि.नाशिक येथे द्राक्षांच्या बागेमध्ये लपून बसलेल्या संशयीत इसमाचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यातील इसमास त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल विश्वनाथ मोरे, 30,रा.साकुरी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र किरण रामदास वाघ, रा.साकुरी,ता.राहता, जि.अहिल्यानगर (फरार) याचे मदतीने केलेला आहे.आरोपी हे दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री दारू पिण्यासाठी छत्रपती कॉम्प्लेक्स,राहाता येथे गेले होते त्यावेळी आरोपीतांनी हॉटेल मल्हार मध्ये कामास असलेल्या गणेश भाऊसाहेब कसाब यास दारू पिण्यासाठी पाण्याच्या बाटलीची मागणी केली परंतु त्याने पाण्याची बाटली दिली नाही या कारणावरून आरोपीतांनी मयत गणेश भाऊसाहेब कसाब यास छत्रपती कॉम्प्लेक्स मधील बेसमेंट खाली पाडून,लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच भिंतीवर डोके आपटून, दोरीने मयतास गळा आवळून त्यास जीवे ठारले असल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी उपविभाग,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page