Maharashtra247

केडगाव मधील प्रचार फेरीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद केडगावकर आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाची परतफेड मोठ्या मताधिक्याने करणार

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचे केडगाव मध्ये प्रचार रॅली दरम्यान स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.केडगाव वेशीजवळ उमेदवार आ.संग्राम जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर,माजी नगरसेवक मनोज कोतकर,महेंद्र कांबळे,गणेश नन्नवरे, राहुल कांबळे,सुनील कोतकर,जालिंदर कोतकर,सुनील लोंढे,पोपट कराळे, आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी संग्राम जगताप म्हणाले की केडगाव भागात झालेल्या विकास कामाने नागरिकांमध्ये माझ्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे केडगाव भागातून मला समर्थन भेटत आहे.व २० नोव्हेंबर रोजी आपले बहुमोल मत हे मतदानाच्या माध्यमातून करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page