नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स पॅक्टिशनर्स व अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशनचा आ.संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा
अहिल्यानगर प्रतिनिधी:-नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे.अनेक जण आ.जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचार करत आहेत.
त्यातच नार्थ महाराष्ट्र टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशन व अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला असून त्याबाबतचे पत्र माजी आमदार अरुणकाका जगताप यांना दिले.यावेळी असोसिएशनच्यावतीने आ.जगताप मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे म्हणाले,आमची संघटना अहमदनगर,नाशिक,धुळे, जळगाव,नंदूरबार पाच जिल्हयात कार्यरत आहे.नगर शहरामध्ये साडेचारशे सभासद असून प्रत्येकाचे 500 सभासद आहेत.संघटनेचे मोठे जाळे पसरलेले आहे.नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी भरीव कामे केली आहे.त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापुढेही शहराच्या विकासात ते भर घालतील. त्यांच्यासारख्या तरुण आमदाराची शहराला गरज असून विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी होतील असा विश्वास डोंगरे यांनी व्यक्त केला.
अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकामांमुळे अहिल्यानगरचा चेहरा बदलला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छतेच्या सुविधा उच्च दर्जाच्या झाल्या आहेत. खेळाच्या आधुनिक मैदानांपासून ते उद्यानांपर्यंतचे कामे सुरु आहेत. शहराचे सौंदर्य वाढल्याने नागरिकांमध्ये सामाधानाचे वातावरण आहे. तरुणांसाठी रोजगार मिळावा म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. शहर आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहे. त्यामुळे शहरात अजून भरीव विकास करायचा असेल तर आमदार संग्राम जगताप यांची गरज असल्याने संघटनेच्यावतीने पाठिंबा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
नगर शहरात आमदार संग्रा जगताप यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला. त्यामुळे शहराचे नाव राज्यात घेतले जाते. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामे होत असल्याने, विकासाचे व्हिजन असल्याने व्यक्तिमत्व पाहून असोसिएशनच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे सह सेक्रेटरी आनंद लहामगे यांनी सांगितले. आ. जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असेे ते म्हणाले.
यावेळी अॅड. पुरुषोत्त रोहिडा, जॉईंड सेक्रेटरी आनंद लहामगे, सुनिल कराळे, अशोक धायगुडे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स पॅक्टिशनर्स असोसिएशनचे किशोर गांधी, अंबादास गाजुल, अॅड. निलेश चोरबेले, करण गांधी उपस्थित होते.