शेतकऱ्याच्या कृषीपंपाच्या मोटरीची वारंवार होतीय चोरी;चोरट्यांचा बंदोबस्त करून तात्काळ कारवाईची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबुत गावांमधील रहिवासी असलेले योगेश कडलग या मागासवर्गीय शेतकऱ्याची पाणी उपसा करणारी कृषी पंपाची मोटर अनेक वेळा चोरीला गेली आहे.
त्याबाबतची तक्रार वेळोवेळी पोलीस स्टेशनला दिली आहे. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्याकडे चोरीच्या तपास करणे कामी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत.परंतु पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.योगेश कडलग रा.जांबुत बुद्रुक तालुका संगमनेर मोटार दि.16.6.2021 रोजी पाच एच.पी पाणबुडी मोटर चोरीला गेली होती.त्यानंतर घारगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला त्याबाबत कुठली कारवाई झाली नाही.
त्या नंतर दिनांक 4.10.2024 रोजी पुंन्हा योगेश कडलग यांची पाच एचपी पाणबुडी मोटर चोरीला गेल्यानंतर घारगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रारअर्ज दिला पण अजूनही त्या अर्जा वर कोणतीही कार्यवाही झाली नाही.पोलीस कर्मचारी चोरांची माहिती सांगा आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे उत्तर देत आहे.यापूर्वी मोटर चोरीला गेली त्यावेळेस योगेश कडलग यांचे शेत 6 महिने पडीक राहिले होते.आताही मोटर चोरीला गेल्यामुळे कडलग कुटुंबीयांचे शेत पडीक राहून कुटुंबियांवर उपासमारी वेळ आली आहे.
कडलग कुटुंबीयांच्या मते कोणीतरी मुद्दामून त्रास देण्याच्या हेतूने चोरी करत आहेत.मोटारी चोरी करणारे चोर स्थानिक परिसरातील असण्याची दाट शक्यता आहे.पोलीस प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करावी.तरी घारगाव पोलिस निरीक्षक यांनी विशेष लक्ष देऊन चोरांचा शोध घेणे कामे तातडीने कारवाई करण्याची मागणी कडलग कुटुंबियांनी केली आहे.