सकल जैन समाजातील साधू साध्वी भगवंतांना विहार दरम्यान पोलीस संरक्षण मिळणार आदेश जारी;इंजिनीयर यश शहा यांच्या मागणीला यश
अहिल्यानगर प्रतिनिधी:-जैन समाजाचा चातुर्मास पर्व दि.१५ नोव्हेंबर रोजी संपत असून तात्काळ सकल जैन समाजातील साधू साध्वी भगवंतांचा विहार पदभ्रमण चालू होत आहे.सकल जैन समाजातील साधू साध्वी भगवंत मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर जिल्ह्यातून पदभ्रमण करत असतात.
त्यांचा विहार सुखरूप, सुरक्षित व्हावा या अनुषंगाने इंजिनियर यश प्रमोद शहा,मिशन सेफ विहार राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष,महावीर निर्वाण कल्याणाक महोत्सव समिती अशासकीय सदस्य अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ महाराष्ट्र समिती सदस्य, व ऑल व जैन अलर्ट ग्रुप ऑफ इंडिया महाराष्ट्र समिती सदस्य या सर्व सकल जैन संघटना पदाधिकारी नात्याने सकल जैन अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अहिल्यानगर जिल्हा यांना ई-मेल द्वारे तसेच फोन द्वारे विनंती केली होती की दि.१५/११/२०२४ पासून चातुर्मास समाप्ती नंतर तात्काळ अल्पसंख्यांक जैन साधू साध्वी गुरु भगवंत यांचे विहार पदभ्रमण चालू होत आहे.या पदभ्रमण विहार दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात आपण जिल्हा पोलीस प्रशासन तसेच या संबंधित सर्व शासकीय अधिकारी तसेच विभागाला तात्काळ सूचना कराव्यात की विहारा दरम्यान पोलीस संरक्षण तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी जिल्ह्यात शासकीय शाळा,महाविद्यालय, कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या काही कालावधी करिता विहार दरम्यान मुक्कामाचे सुविधा,प्रवचन करिता सार्वजनिक ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या संबंधात जिल्हा प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती शहा यांनी केली होती.
जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने इंजि. यश शहा यांच्या या ईमेलची तात्काळ दाखल घेत यासंदर्भातील आदेश परिपत्रक तात्काळ जारी केले आहे. व या संदर्भातील तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना यासंदर्भातील सर्व सहकार्य विहार दरम्यान करण्याचे पत्रकारद्वारे कळवले देखील आहे.तसेच शहा यांनी मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय अल्पसंख्यांक विभाग यांना देखील संपूर्ण महाराष्ट्रात विहार दरम्यान पोलीस सुरक्षा देण्यासंदर्भातील पत्र ई-मेल द्वारे पाठवले आहे. शहा यांच्या ईमेलचे दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ या संदर्भात संबंधित गृह विभाग शाखेला कळवले देखील आहे.शहा यांनी जिल्हा प्रशासनाचे पत्रक ईमेल द्वारे तसेच फोन द्वारे पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, जिल्हा विशेष शाखा ,पोलीस कंट्रोल रूम, सर्व पोलीस निरीक्षक , जिल्हा परिषद व महानगरपालिका व संबंधित सर्व विभागांना तात्काळ पाठवले आहे .
व सकल जैन समाजाच्या वतीने विनंती केली आहे की या संदर्भातील सर्व सरकारी यंत्रणांना तात्काळ पत्रकार द्वारे आदेश द्यावे.अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चातुर्मास संपल्यानंतर साधू साधू भगवान त्यांचा विहार होत असतो यादरम्यान त्यांचा विहार सुखरूप ,सोयीस्कर व्हावा यासाठी आपण सर्व सहकार्य करण्याचे विनंती सकल जैन समाजा वतीने केली आहे .