अहिल्यानगर प्रतिनिधी (दि.४ प्रतिनिधी):-पीपल्स रिपब्लिकन पार्टीची अहिल्यानगर जिल्हा व शहर नवीन कार्यकारणी निवड व महत्वपूर्ण बैठक दि.१२ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा लघुउद्योग महामंडळ उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे.व अहिल्यानगर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वतीने लघुउद्योग महामंडळ उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या भव्य सत्काराचेही यावेळी आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील बैठक हि छत्रपती संभाजीनगर रोड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रक सुमेधभाई गायकवाड यांनी केले आहे.